जोफ्रा आर्चरची एक चूक, या क्रिकेट बोर्डाला झाले असते कोट्यावधीचे नुकसान

वेस्ट इंडिज आणि इंग्लंडच्या संघामध्ये कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात इंग्लडचा बॉलर जोफ्रा आर्चरला बायो सिक्युरिटीच्या नियमांचा भंग केल्याने वगळण्यात आले आहे. आयसीसीने कोरोनाच्या संकटात खेळाडूंसाठी काही नियम आखून दिले आहेत. नियम तोडल्याने आता जोफ्रा आर्चरला 5 दिवस आयसोलेशनमध्ये राहावे लागणार आहे. मात्र जोफ्रा आर्चरने नियमांचा भंग केल्याने बोर्डाला कोट्यावधी रुपयांचे नुकसान होईल असे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाचे (ईसीबी) संचालक एशले जाइल्स यांनी म्हटले आहे.

एशले जाइल्स म्हणाले की, जोफ्रा आर्चरला कोव्हिड-19 प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याने कारवाईचा सामना करावा लागेल. कारण यामुळे मोठी समस्या निर्माण झाली असती व ईसीबीला कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले असते. आर्चरने कोणत्या नियमांचे उल्लंघन केले हे त्यांनी स्पष्ट केले नसले तरी रिपोर्टनुसार तो पहिल्या कसोटी सामन्यानंतर ब्राइटनला आपल्या घरी गेला होता, असे सांगितले जाते.

जाइल्स म्हणाले की, प्रत्येक चुकीच्या कामासाठी कारवाई व्हायला हवी. यामुळे मोठी समस्या निर्माण झाली असते. या प्रभाव संपुर्ण सत्रावर झाला असता व आम्हाला कोट्यावधी पाउंडचे नुकसान झाले असते. मला वाटत नाही की त्याला याच्या संभावित परिणामाबद्दल माहिती असेल. तो तरूण असून, तरूण चूकी करतात. त्याने यातून शिकायला हवे.

ते म्हणाले की, सामान्य परिस्थितीमध्ये सामान्यांदरम्यान घरी जाणे सामान्य प्रक्रिया असते. मात्र जैव सुरक्षित वातावरण तयार करण्यासाठी खूप मेहनत आणि पैसा लागतो. दरम्यान, आर्चरने आपल्या चुकीबद्दल माफी मागत, स्वतःला क्वारंटाईन केले आहे.