भारत-चीनच्या लोकांवर आमचे प्रेम, शांततेसाठी शक्य ते प्रयत्न करणार – ट्रम्प

भारत आणि चीनच्या लोकांमध्ये शांततेसाठी शक्य ते प्रयत्न केले जातील, असे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. ही माहिती ट्रम्प यांच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.

मागील काही दिवसांपासून भारत-चीन सीमावादात अमेरिका चीनच्या विरोधात जाऊन भारताचे समर्थन करत आहे. व्हाईट हाऊसचे सेक्रेटरी केलेघ मॅक इनेनी यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले, ते (डोनाल्ड ट्रम्प) म्हणाले की भारत आणि चीनच्या लोकांवर आपले प्रेम आहे आणि दोन्ही देशांमध्ये शांततेसाठी शक्य ते प्रयत्न केले जाईल. भारत-चीन सीमावादावर ट्रम्प काय संदेश देतील या प्रश्नावर उत्तर देताना केलेघ मॅक इनेनी यांनी ही माहिती दिली.

याआधी व्हाईट हाऊसचे आर्थिक सल्लागार लॅरी कुडलॉने म्हटले होते की, भारत अमेरिकेचा चांगला मित्र आहे. राष्ट्रपती ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी चांगले मित्र आहे आहेत.

पंतप्रधान मोदींनी अमेरिकेच्या 244व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ट्विट करत शुभेच्छा दिल्या होत्या. यावेळी देखील ट्रम्प यांनी आभार मानच अमेरिकेचे भारतावर प्रेम असल्याचे म्हटले होते.

Loading RSS Feed