लँसेंटचा धक्कादायक दावा! भारतातील 640 पैकी 627 जिल्हे कोरोनाच्या विळख्यात

भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 10 लाखांच्या पुढे गेला असून, मृत्यू झालेल्यांची संख्या 25 हजारांच्या पार आहे. द लँसेंटच्या एका रिपोर्टनुसार, भारतातील 98 टक्के भाग कोरोना व्हायरसच्या विळख्यात आहे.  अमेरिकेनंतर भारतातच कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असून, देशातील 640 जिल्ह्यापैंकी 627 जिल्ह्यात कोरोना व्हायरसचा प्रसार झाला आहे.

लँसेंटच्या रिपोर्टनुसार, भारतात कोरोना व्हायरसची स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा स्तरीय योजना बनविण्याची आणि त्यांना लागू करण्याची गरज आहे. याशिवाय जे भाग विशेष प्रभावित आहे त्यावर अधिक लक्ष देण्याची गरज आहे. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की सर्वाधिक संक्रमण असलेल्या भागामध्ये पुन्हा लॉकडाऊन किंवा अन्य निर्बंध घालण्याची गरज आहे.

या रिपोर्टनुसार, मध्य प्रदेश, बिहार, तेलंगाना, झारखंड, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि गुजरात या राज्यात कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग झाला आहे. भारतातील उत्तर-पुर्व राज्यांमध्ये हे प्रमाण अद्याप कमी आहे. लँसेंटचा हा रिपोर्ट सामाजिक-आर्थिक, जनसंख्या, आवास-स्वच्छता, महामारी विज्ञान आणि आरोग्य प्रणालीच्या आधारावर बनविण्यात आलेला आहे.

लँसेंटनुसार, विशेष काळजी घेतली नाही कर या 9 राज्यांमधील स्थिती अधिक गंभीर होईल.