या यूनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी बनवली पैसे मोजण्यासह नोटांना सॅनिटायझ करणारी मशीन

एपीजे अब्दुल कलाम टेक्निकल यूनिव्हर्सिटीच्या अनुज शर्मा आणि त्यांच्या टीमने दावा केला आहे की त्यांनी पैसे मोजणारी अशी मशीन बनवली आहे, जी नोटांचे निर्जंतुकीकरण करते. म्हणजे नोटांना पुर्णपणे सॅनिटायझ करते. ही मशीन बनविण्यासाठी 14-15 हजार रुपये खर्च आला. ही मशीन एका मिनिटामध्ये 200 नोटा मोजते.

एएनआयने नोट मोजणाऱ्या मशीनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये दिसत आहे की, मशीनमध्ये सॅनिटायझर देखील लावण्यात आलेला आहे व सहज पैसे मोजता येतात. कोरोना व्हायरस संकटाच्या काळात लोकांच्या सुरक्षेची काळजी घेऊन ही मशीन तयार करण्यात आली आहे.

कोरोना संकटाच्या काळात नोटा सॅनिटायझ करण्यासाठी ही मशीन उपयुक्त ठरणार आहे. सोशल मीडियावर मशीनचे फोटो व्हायरल होत असून, नेटकरी मशीन बनवणाऱ्यांचे कौतुक करत आहेत.