बालभारतीच्या आठवीच्या पुस्तकात क्रांतिकारी सुखदेव यांचा अपमान केल्याने संताप


मुंबई – भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात हौतात्म्य पत्करले हा इतिहास आपल्यापैकी सर्वानाच माहित आहे. याच इतिहासाची मोडतोड बालभारतीच्या आठवीच्या पुस्तकात करण्यात आली आहे. ही अक्षम्य चूक भगतसिंग, राजगुरु यांच्यासह फासावर गेलेल्या तिसऱ्या क्रांतिकारकाच्या नावात करण्यात आल्याचे ब्राह्मण महासंघाच्या आनंद दवे यांनी निदर्शनास आणले आहे.

बालभारतीच्या आठवीच्या पुस्तकात सुखदेव यांच्याजागी कुर्बान हुसेन फासावर गेले, असा उल्लेख करण्यात आला आहे. हा मुद्दा ब्राह्मण महासंघाने उपस्थित केला असून हा सुखदेव यांचाच नव्हे तर समस्त क्रांतिकारकांचाच अपमान असल्याचा संताप व्यक्त केला आहे. ही सर्व पुस्तके मागे घेऊन संबंधित लोकांवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

यदुनाथ थत्ते यांचा ‘माझ्या देशावर प्रेम आहे’ असा धडा बालभारतीच्या आठवीच्या पुस्तकात आहे. या धड्यात व्यक्ती शाळकरी मुलांनी देशप्रेमाबद्दल समजावून सांगत आहे. यावेळी त्यांच्यातील भगतसिंग, राजगुरु, कुरबान हुसेन हे फासावर गेले. ते देशावर खरेखुरे प्रेम करत होते, असा संवाद धड्यात देण्यात आला असून एका विद्यार्थ्याने विचालेल्या प्रश्नात ही घोडचूक करण्यात आली आहे.

दरम्यान धड्याच्या सुरुवातीला देण्यात आलेल्या माहितीनुसार, हा धडा प्रसिद्ध लेखक, संपादक, पत्रकार, बालसाहित्यकार, चरित्रकार यदुनाथ थत्ते यांच्या ‘प्रतिज्ञा’ या पुस्तकातून घेण्यात आला आहे. पुस्तकालील प्रतिज्ञेच्या तिसऱ्या वाक्याचा आशय या धड्यातून उलगडण्यात आला आहे.

या चुकीकडे ब्राह्मण महासंघाने लक्ष वेधत संताप व्यक्त केला आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण प्रसारक मंडळाकडून एवढी गाढव चूक अपेक्षित नाही अशी टीका करताना ही सर्व पुस्तके मागे घेऊन संबंधितांवर त्वरीत कारवाई करावी अशी मागणी ब्राह्मण महासंघाने केली आहे.

पुस्तकाची पीडीएफ लिंक https://fliphtml5.com/aodjm/xrja/basic