ठाकरे पिता-पुत्रावर वादग्रस्त ट्विट करणाऱ्याचे निलेश राणेंकडून समर्थन


मुंबई – समित ठक्कर या व्यक्तिच्या विरुद्ध मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या विरोधात वादग्रस्त ट्विट केल्याप्रकरणी नागपुरात गुन्हा दाखल झाला असून ट्विटवर समित ठक्कर याने एक फोटो शेअर केला आणि त्या फोटोला संदर्भ देत ‘महाराष्ट्राचे मोहम्मद अझम शाह आणि बेबी पेंग्विन’ असा आदित्य ठाकरे यांचा उल्लेख आणि ‘ मॉडर्न युगातील औरंगजेब’ असा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उल्लेख केला होता.

दरम्यान, भाजप नेते निलेश राणे यांनी समित ठक्कर याच्या या ट्विटचे समर्थन करत, आम्ही तुझ्या सोबत आहोत. ते कोणासोबत असे वागू शकत नाही, असे ट्विट करत मुख्यमंत्री आणि पर्यावरण मंत्री यांच्याविरूद्ध समित याने केलेल्या वादग्रस्त टीकेला पाठिंबा दिला आहे.

यासंदर्भात वी पी रोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समित ठक्कर नावाच्या व्यक्तिने १ जुलैला ट्विटवर एक फोटो शेअर केला आणि त्या फोटोला संदर्भ देत आदित्य ठाकरे यांचा उल्लेख ‘महाराष्ट्राचे मोहम्मद अझम शाह आणि बेबी पेंग्विन’ आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उल्लेख ‘ मॉडर्न युगातील औरंगजेब’ असा केला. तसेच तक्रारीमध्ये सांगितल्याप्रणाणे या व्यक्तीने राऊत यांच्याविरोधातसुद्धा ट्विट केले आहे.

ही तक्रार युवासेनेचे कायदेशीर प्रमुख धर्मेंद्र मिश्रा यांनी दाखल केली आहे. यात त्यांनी असे म्हटले आहे की, मी ठक्कर याचे ट्विटर अकाऊंट पहिले तर मला असे निदर्शनास आले की याआधी देखील त्याने अशीच वादग्रस्त वक्तव्य केली होती. महत्वाची बाब म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद मोदी त्याला फॉलो करत आहेत. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे की अशा लोकांना देशाचे पंतप्रधान फॉलो करत आहेत. वी पी रोड पोलिसांनी भारतीय दंडविधान अंतर्गत सेक्शन २९२, ५०० आणि सेक्शन ६७ गुन्हा दाखल केला आहे आणि ठक्कर व्यक्तींला नोटीस पाठवली आहे.