भाजप युवा मोर्चाच्या उपाध्यक्षपदी वीरप्पनच्या कन्येची नियुक्ती


चेन्नई – काही महिन्यांपूर्वी भाजपमध्ये कुख्यात चंदन तस्कर वीरप्पन याच्या कन्येने प्रवेश केला होता. दरम्यान, आता वीरप्पनची कन्या विद्याराणी हिची भाजपच्या तामिळनाडू प्रदेश कार्यकारिणीने तामिळनाडू भाजपा युवा मोर्चाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. विद्या राणी हिच्याप्रमाणेच विविध पदांवर माजी मुख्यमंत्री एम.जी. रामचंद्रन यांचे नातेवाईक आणि इतर अनेक चित्रपट कलावंतांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

पुढील वर्षी तामिळनाडूमध्ये विधानसभेची निवडणूक होणार असल्यामुळे भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणारे एल. मुरुगन हे राज्यात यावर्षीच पक्षाचा विस्तार करण्यासाठी प्रयत्नशील असल्यामुळेच या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान, पक्षाच्या राज्य कार्यकारिणी समिती सदस्य म्हणून एआयएडीएमकेचे संस्थापक एमजी रामचंद्रन यांची दत्तक कन्या गीता, रामचंद्रन यांचे भाऊ एमसी चक्रपाणी यांचा मुलगा आर. प्रवीण आणि अभिनेत्री राधा रवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.