… म्हणून टीक-टॉकला ठोठावण्यात आला 1 कोटींचा दंड

शॉर्ट व्हिडीओ अ‍ॅप टीक-टॉकवर भारतात बंदी घालण्यात आली आहे. असे युजर्स डेटा आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणामुळे करण्यात आले आहे. आता दक्षिण कोरियाने या अ‍ॅपवर कारवाई करत, मोठा दंड ठोठावला आहे. टीक-टॉकवर लहान मुलांच्या डेटाचा चुकीचा वापर करण्याचा आरोप आहे. अ‍ॅपवर 155,000 डॉलरचा दंड लावला आहे.

दक्षिण कोरिया कम्यूनिकेशन्स कमिशनने (केसीसी) चीनी कंपनी 186 मिलियन वॉनचा (जवळपास 1.1 कोटी रुपये) दंड लावला आहे. केसीसी दक्षिण कोरियात टेलिकम्यूनिकेशन्स आणि डेटासंबंधी सेक्टर्सचे रेग्यूलेटर म्हणून काम करते. टीकटॉक युजर्सचा खाजगी डेटा सुरक्षित न ठेवल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

कमी वयाच्या युजर्सच्या डेटाबाबत टीक-टॉकची चूक समोर आली आहे. कंपनीवर लावण्यात आलेला दंड हा दक्षिण कोरियातील त्यांच्या वार्षिक उत्पन्नाच्या 3 टक्के आहे. टीक-टॉक पालकांच्या परवानगीशिवाय 14 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांचा डेटा गोळा करत असल्याचा व त्याचा वापर करत असल्याचे आढळले होते.

केसीसीनुसार, 31 मे 2017 ते 6 डिसेंबर 2019 दरम्यान चाइल्ड डेटाचे 60007 पीस कलेक्ट केले. याशिवाय डेटा दुसऱ्या देशात जात असल्याचे देखील युजर्सला सांगितले नाही.