सॅमसंगचा बजेट फोन ‘गॅलेक्सी एम01एस’ भारतात लाँच

सॅमसंग गॅलेक्सी एम01एस भारतात लाँच झाला आहे. हे सॅमसंग गॅलेक्सी एम01 चे हँडसेटचे नवीन व्हर्जन आहे. या दोन्ही फोनमधील अनेक फीचर्स एकसारखेच आहेत. मात्र नवीन मॉडेलमध्ये मीडियाटेक हीलियो पी22 प्रोसेसर देण्यात आले आहे. तर जुन्या मॉडेलमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 439 प्रोसेसर देण्यात आले होते. नवीन स्मार्टफोनमध्ये 2 रियर कॅमेर, 4,000 एमएएच बॅटरी आणि रिअर फिंगरप्रिंट सेंसर मिळेल. फोन 2 रंगात उपलब्ध आहे. हा फोन लाइट ब्लू आणि ग्रे रंगात मिळेल.

सॅमसंग गॅलेक्सी एम01एस स्मार्टफोनमध्ये 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. या व्हेरिएंटची किंमत 9,999 रुपये आहे. ड्युअल सिम सपोर्ट हा स्मार्टफोन अँड्राईड पाय 9 वर आधारित वन यूआयवर चालतो. यात 6.2 इंच एचडी+ (720×1,280 पिक्सल) टीएफटी डिस्प्ले आहे. याच्या फ्रंट कॅमेऱ्यासाठी ‘इनफिनिटी व्ही कट’ नॉच मिळेल. फोनमध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो पी22 प्रोसेसर देण्यात आला आहे.

फोनच्या कॅमेऱ्याबद्दल सांगायचे तर यात ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. व्हर्टिकल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 13 मेगापिक्सल प्रायमेरी कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा मिळेल. कॅमेरा लाईव्ह फोक्स सपोर्टसह येतो असा कंपनीचा दावा आहे. तर सेल्फीसाठी फोनमध्ये 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा मिळेल.

सॅमसंग गॅलेक्सी एम01एसच्या अन्य फीचर्सबद्दल सांगायचे तर यात डॉल्बी एटएम टेक्नोलॉजी देण्यात आली आहे. कनेक्टिव्हिटी फीचर्समध्ये ब्लूटूथ, वाय-फाय आणि 4जी एलटीईचा समावेश आहे. बायोमॅट्रिक सिक्युरिटीसाठी यात फिंगरप्रिंट देखील आहे. फोनमध्ये 4000 एमएएच बॅटरी मिळेल.