या टीप्स वापरुन हॅकर्सपासून वाचवा आपले Twitter अकाउंट


आज सकाळी सगळ्याच माध्यमांच्या प्रमुख बातम्यांमध्ये ट्विटरवरील काही बड्या हस्तींचे ट्विटर अकाउंट हॅक झाल्याची बातमी झळकत होती. या बड्या हस्तींमध्ये एलन मस्क, बिल गेट्स, जेफ बेजोस आणि अॅपलसारख्यांच्या अकाउंटचा समावेश होता. हॅकर्सने हे अकाउंट्स हॅक करण्यासाठी क्रिप्टोकरन्सी स्कॅम प्रमोट करणारे एक ट्विट केले होते. त्याचबरोबर या पद्धतीची पोस्ट अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, केन वेस्ट, किम कादर्शियान वेस्ट, वॉर्न बफेट आणि माइक ब्लूमबर्ग यांच्या ही ट्विटर अकाउंट्सवरुन करण्यात आली.

पण ज्या वेळी ट्विटर अकाउंट हॅकर्सकडून हॅक करण्यात येते, त्यावेळी एखाद्या युजर्सची महत्वाची माहिती चोरीला जाण्याची शक्यता सर्वाधिक असते. या माहितीच्या आधारे फसवणूक देखील केली जाऊ शकते. अशातच तुम्हाला जर तुमचे ट्विटर अकाउंट हॅक होण्यापासून वाचवायचे असेल, पुढील काही टीप्स जरुर लक्षात ठेवा.

हॅकर्सपासून ट्विटर अकाउंट वाचवण्यासाठी काय करावे आणि काय करु नये?

  • Twitter युजर्सने एक 10 शब्द असलेला Strong असा पासवर्ड सेट करावा.
  • पासवर्ड सेट करतेवेळी तुम्ही तुमच्या की-बोर्ड किंवा की-पॅडवरील अप्परकेस, लोअरकेस, नंबर किंवा स्पेशल कॅरेक्टर अथवा सिंम्बॉल यांचा वापर करा.
  • प्रत्येक सोशल मीडिया अकाउंटसाठी युजर्सने वेगवेगळा पासवर्ड सेट करावा.
  • पासवर्ड जनरेट करतेवेळी खासगी माहिती जसे फोन क्रमांक, बर्थ डेट यांचा वापर करु नये.
  • तसेच पासवर्ड तयार करताना डिक्शनरी वर्ड जसे iLoveYou यांचा वापर करु नये.
  • त्याचसोबत क्रमवारीनुसार म्हणजेच abcd1234 याचा सुद्धा वापर करु नये.

त्याचबरोबर या गोष्टी देखील जरुर लक्षात ठेवा

  • लॉगिन वेरिफिकेशनसह OTP वापरताना सिक्युरिटी लेअर वाढवू शकता. त्यामुळे तुमचे अकाउंट अधिक सुरक्षित राहू शकते.
  • पासवर्ड रिसेट करण्यासाठी Email किंवा फोन क्रमांक जरुर द्या.
  • कोणत्याही थर्ड पार्टीला तुमचे युजर्सनेम किंवा पासवर्ड देऊ नका. फॉलोअर्स वाढवू अशी ऑफर जे तुम्हाला करतील.
  • नेहमीच तपासून पहा की तुमचे कंप्युटर सॉफ्टवेअर आणि ब्राउजर अपडेटेड आहे. तसेच फोन किंवा लॅपटॉपमध्ये अॅन्टी व्हायरसचा आवर्जुन वापर करा.
  • तसेच सोशल मीडियावर एखादी पोस्ट करण्यापूर्वी त्याच्या सत्यतेबाबत सुद्धा जाणून घ्या. कारण गेल्या काही दिवसांपूर्वीच ट्वीटरने खोटी माहिती देणाऱ्या अकाउंटवर कारवाई केली होती.