पाक मीडियाची माहिती ; कुलभूषण जाधव यांना दुसर्‍यांदा देण्यात आला Consular Access


नवी दिल्ली – पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नौसेना सेवानिवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांना दुसर्‍यांदा Consular Access देण्यात आला असल्याचे वृत्त पाकिस्तानी मीडियाने दिले आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या भेटीसाठी भारतीय उच्चायुक्त वकिल पोहचले आहेत. पण त्याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. दरम्यान कुलभूषण जाधव यांना मृत्यूदंडाच्या शिक्षेविरूद्ध अपिल करण्यासाठी काल परवानगी देण्यात आली आहे.

हेरगिरी आणि दहशतवादाचा आरोप कुलभूषण जाधव यांच्यावर आहे. याप्रकरणी पाकिस्तानी सैन्य न्यायालयाकडून एप्रिल 2017 मध्ये त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्यानंतर हे प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयात पोहचले आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने या प्रकरणात पाकिस्तानला त्यांची शिक्षा कमी करण्याचा आणि लवकरात लवकर काऊन्सर अॅक्सेस देण्याचा आदेश दिला होता. तेव्हापासून भारत या निर्णयाची अंमलबजावणी होण्यासाठी पाकिस्तानशी चर्चा करत आहे.

कुलभूषण जाधव यांच्याशी निगडीत कोणत्याही बाबतीत सामंजस्य करार करण्यास गेल्या वर्षी पाकिस्तानने नकार दिला होता. तसेच पाकिस्तानने सप्टेंबर 2019 मध्ये कुलभूषण जाधव यांना दुसरा कॉऊन्सलर एक्सेस देण्यास नकार दिला होता. दरम्यान एएनआय या वृत्तसंस्थेला कुलभुषण जाधव यांचे बालमित्र अरविंद जाधव यांनी दिलेल्या माहितीमध्ये मागच्या वेळेस जेव्हा कुलभूषण यांना काऊन्सलर एक्सेस दिला होता, तेव्हा त्याच्या आई,पत्नी वडिल यांच्यासोबतच अनुभव भारतासाठी अपमानजनक होता. त्यामुळे आता तो देताना बिनाशर्त देण्यात यावा.