एक चूक झाली आणि तो रातोरात झाला 15 कोटींचा मालक

अनेकदा एकाच्या चुकीमुळे दुसऱ्या व्यक्ती फायदा होता. अमेरिकेच्या मिशिगनमध्ये अशाचप्रकारे एका व्यक्तीच्या चुकीमुळे दुसरा व्यक्ती कोट्याधीश झाला आहे. येथील लॉटरी देणाऱ्या क्लर्कने एका व्यक्तीला चुकीचे तिकिट दिले. मात्र त्या माणसाचे नशीब एवढे भारी की, त्याला चुकीच्या तिकिटामुळे 15 कोटींची लॉटरी लागली.

ज्या व्यक्तीला लॉटरी लागली आहे, ती व्यक्ती आपल्या पत्नीच्या गाडीमध्ये हवा भरण्यासाठी गेला होता. व्यक्तीने सांगितले की, तो सुट्टे पैसे घेण्यासाठी स्टेशन क्लर्ककडे गेला व त्याच्याकडून 10 डॉलर्स किंमतीची लकी 7 तिकिटे खरेदी केली. मात्र क्लर्कने चुकीने 20 डॉलर्स किंमत असलेले तिकिट दिले. नंतर त्याने बदलून घेण्यास देखील सांगितले, परंतू मी तीच ठेवली. याच तिकिटाने नंतर त्याला कोट्याधीश बनवले.

या 57 वर्षीय व्यक्तीने आपले नाव सांगितले नाही, मात्र या 2 मिलियन डॉलर्सच्या (15 कोटी रुपये) लॉटरीची रक्कम कोठे खर्च करणारे हे मात्र सांगितले. त्याने सांगितले की, एक नवीन घर खरेदी करायचे आहे. एकाचवेळी सर्व पैसे काढल्यास व्यक्तीला 1.3 मिलियन डॉलर्स मिळतील.

Loading RSS Feed