चीनला आणखी एक झटका, हायवे प्रकल्पांमधील चीनी कंपन्यांची बोली रद्द

गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर भारत चीनला एकामागोमाग एक झटके देत आहे. आधी 59 चीनी अ‍ॅप्स बंद केल्यानंतर आता सरकारने दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे संबंधीत दोन चीनी कंपन्यांचे कंत्राट रद्द केले आहे. सुरक्षेच्या कारणामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

नवभारत टाईम्सच्या वृत्तानुसार, परिवहन मंत्रालयाच्या सुत्रांनी सांगितले की मंत्रालय 800-800 कोटींचे दोन प्रोजेक्टसाठी दोन चीनी कंपन्यांच्या सब्सिडियरीला संधी देणार नाही. दोन्ही चीनी कंपन्यांना लेटर ऑफ अवॉर्ड देण्यास नकार दिला आहे.

केंद्रीयमंत्री नितिन गडकरी यांनी आधीच स्पष्ट केले होते की, कोणत्याही हायवे प्रोजेक्टमध्ये चीनी कंपन्यांना कोणत्याही प्रकारे प्रवेश मिळणार नाही. याशिवाय जर सध्या चालू असलेल्या प्रोजेक्टमध्ये चीनी कंपनी असेल तर टेंडर रद्द करून पुन्हा जारी केली जाईल.

Loading RSS Feed