भारतात नोव्हेंबरपर्यंत 1 कोटींवर पोहचणार कोरोनाग्रस्तांचा आकडा, अभ्यासात दावा

भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा लवकरच 10 लाखांच्या पुढे जाणार आहे. केंद्र सरकारपासून ते राज्य सरकारपर्यंत सर्वचजण या व्हायरसवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र दररोज आकडेवारी वाढत आहे. यातच आता एका अभ्यासात समोर आले आहे की सप्टेंबरपर्यंत भारतातील कोरोना रुग्णांची संख्या 35 लाख होऊ शकते. बंगळुरू येथील इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्सच्या (आयआएससी) अभ्यासात हा दावा करण्यात आला आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, सध्याच्या राष्ट्रीय ट्रेंडच्या आधारावर करण्यात आलेले आयएएससीचा अंदाज सांगतो की, सप्टेंबरपर्यंत एक्टिव्ह केस वाढून 10 लाखांपर्यंत जाऊ शकतात. सध्याची परिस्थिती कायम राहिल्यास हा आकडा 20 लाखांच्या पुढे जाईल. ज्यात 4.75 लाख एक्टिव्ह केस आणि 88 हजार लोकांचा मृत्यू होऊ शकतो. या अभ्यासात अंदाज वर्तविण्यात आला आहे की, मार्च 2021 पर्यंत भारतात सर्वात कमी 37.4 लाख कोरोनाग्रस्त असू शकतात. तर सर्वात खराब स्थिती झाल्यास हा आकडा 6.2 कोटींपर्यंत वाढू शकतो. यात 82 लाख एक्टिव्ह केस आणि 28 लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो.

आयआयएसी प्रोफेसर्स शशिकुमार, दीपक एस आणि त्यांच्या टीमनुसार, सर्वात खराब स्थितीमध्ये सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक, तामिळनाडू आणि गुजरात राज्यातील आकडा लाखोंनी वाढेल. तर जवळपास 1.4 लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो.

या अभ्यासानुसार, अंदाज लावण्यात आला आहे की भारतात 1 नोव्हेंबरपर्यंत 1.2 कोटी केस आणि 5 लाख मृत्यू होऊ शकतात. जानेवारी हा आकडा 2.9 कोटींपर्यंत जाऊ शकतो.