रिया चक्रवर्तीला सोशल मीडियावर बलात्कार-जीवे मारण्याची धमकी

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर नेटकरी त्याची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर निशाणा साधत आहेत. नुकतेच तिने सुशांतच्या निधनाला 1 महिना झाल्याने भावूक पोस्ट लिहिली होती, यानंतर तिला ट्रोलर्सचा सामना करावा लागला होता. रियाला आता सोशल मीडियावर बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी मिळत आहे. यानंतर तिने या प्रकरणात सायबर क्राईम सेलकडे मदत मागितली आहे.

सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने लिहिले की, माझ्यावर अनेक आरोप करण्यात आले, मी गप्प राहिले. मला हत्यारा म्हटले मी गप्प राहिले. तिने धमकी देणारी व्यक्ती @mannu_raaut वर निशाणा साधत लिहिले की माझे गप्प बसणे तुम्हाला अधिकार कसे देते की, जर मी आत्महत्या केली नाहीतर बलात्कार आणि माझा जीव घेतला जाईल. तू जे म्हटले आहे, त्याच्या गंभीरतेची जाणीव आहे का ?  हा गुन्हा आहे. मी पुन्हा सांगते की, कोणीही अशाप्रकारच्या द्वेष आणि छळाचे शिकारी होऊ नये.

रियाने सायबर क्राइम सेलकडे मदत मागत या प्रकरणाबात कारवाई करण्याची मागणी केली आहे. आता खूप झाले, असेही तिने शेवटी लिहिले.