264 कोटी खर्च करून उभारलेला पूल कोसळला, 1 महिन्यापुर्वीच केले होते उद्घाटन

बिहारच्या गोपालगंज येथे 264 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेले सत्तरघाट महासेतू काल पाण्याच्या दबावामुळे कोसळला. हा पूल कोसळल्याने चंपारण तिरहुत आणि सारण येथील अनेक जिल्ह्यांचा संपर्क तुटला आहे. या पुलावरील वाहतूक पुर्णपणे बंद झाली आहे. एक महिन्यापुर्वीच 16 जूनला राज्याचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांनी व्हिडीओ कॉन्फ्रेंसिंगच्या माध्यमातून या महासेतूचे उद्घाटन केले होते. विविध जिल्ह्यांना जोडण्यासाठी महत्त्वाचा पूल होता.

गोपालगंज येथे तीन लाखांपेक्षा अधिक क्यूसेकने पाण्याचा प्रवाह होता. पाण्याच्या या दबावामुळे पुलाचा एप्रोच रोड तुटला. हा कोसळलेला पुल बघण्यासाठी आता लोकांना गर्दी केली आहे.

स्थानिक भाजप आमदार मिथिलेश तिवारी यांनी या प्रकरणाची माहिती बिहारचे रस्ते निर्माणमंत्री नंदकिशोर यादव यांना दिली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचा मुद्दा आगामी विधानसभा सत्रात उपस्थित करणार आहेत.

या सेतूची निर्मिती बिहार पुल निर्माण विभागाद्वारे करण्यात आली होती. वर्ष 2012 मध्ये या पुलाचे काम सुरू झाले होते व 16 जून 2020 ला याचे उद्घाटन करण्यात आले होते.