यूएईमध्ये आयपीएलचे आयोजन करण्यासाठी बीसीसीआयचा खटाटोप


मुंबई : क्रिकेटचा महाकुंभ अशी ओळख असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) आयोजनाची तयारी बीसीसीआय करत आहे. पण देशावर ओढावलेल्या कोरोनाच्या संकटामुळे अशा परिस्थितीत आयपीएलचे सामने भारतात खेळवणे शक्य नसल्यामुळे आयपीएल ही परदेशात होण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर यूएईमध्ये आयपीएलचे आयोजन करण्यासाठी बीसीसीआय प्रयत्न करत आहे. त्यातच बीसीसीआयची आयपीएलसाठी पहिली पंसती मुंबईला आहे. पण कोरोनाच्या संकट काळात भारतात कोणत्याही प्रकारचे क्रीडा स्पर्धा होण्याची शक्यता धुसर असल्यामुळे आयपीएलचे सामने यूएईमध्ये खेळवण्यासाठी बीसीसीआय सकारात्मक दिसत आहे. यासंदर्भातील वृत्त द इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.

मुंबईतील कोरोना परिस्थिती आटोक्यात आली तर आयपीएलचे सामने भारताच खेळवले जाऊ शकता. पण सध्याची परिस्थिती पाहता, तसे होणे शक्य नाही. त्यानंतर बीसीसीआयने युएईला आयपीएलसाठी पसंती दिली आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात आयपीएलचे यूएईमध्ये खेळवला जाऊ शकतो, अशी शक्यता वाढली आहे. याबाबत अद्याप कोणताही अधिकृत माहिती बीसीसीआयकडून देण्यात आलेली नसल्यामुळे आता बीसीसीआय काय निर्णय घेणार याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून आहे. याआधी बीसीसीआय समोर ही ऑफर अमिरात क्रिकेट बोर्डाने (ECB) ठेवली होती. यासंदर्भातील एक बातमी गल्फ न्यूजमध्ये जून महिन्यात आली होती.

सध्या सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान आयपीएलच्या आयोजनाची योजना बीसीसीआयने बनवली आहे. कारण यावर्षी ऑस्ट्रेलियामध्ये होणारा टी२० वर्ल्डकप ही रद्द होताना दिसत आहे. यावर अजून निर्णय झालेला नाही. आयसीसीच्या बैठकीत याचा निर्णय होणार आहे. 17 जुलैला बीसीसीआयची बैठक आहे. ज्यामध्ये आयपीएलवर निर्णय होऊ शकतो. यूएईमध्ये आयपीएलचे आयोजन करण्यासाठी तेथील परिस्थिती देखील लक्षात घेतली जाऊ शकते. याआधी देखील २ वेळा आयपीएलचे आयोजन परदेशात करण्यात आलेले आहे.