‘माय लॉर्ड’च्या ऐवजी ‘सर’ म्हणा, या न्यायाधीशांनी पत्र लिहून केली मागणी

कोलकत्ता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश टीबीएन राधाकृष्णन यांची ईच्छा आहे की, त्यांना बंगाल आणि अंडमान येथील सर्व न्यायपालिका अधिकाऱ्यांनी माय लॉर्ड्स किंवा लॉर्ड्सशिपच्या ऐवजी सर म्हणून संबोधित करावे. न्यायालयांमध्ये आजही न्यायाधीशांसाठी माय लॉर्ड किंवा लॉर्ड्सशिप सारखे संबोधन वापरले जाते. या संदर्भात एनडीटिव्हीने वृत्त दिले आहे.

मुख्य न्यायाधीश थोट्टिल बी नायर राधाकृष्णन यांनी रजिस्ट्रीच्या सर्व सदस्यांसह जिल्हा न्यायापालिकाच्या अधिकाऱ्यांना पत्र लिहून संबोधित केले आहे. या पत्रात त्यांनी आपल्याला माय लॉर्ड किंवा लॉर्ड्सशिपच्या ऐवजी सर म्हणून संबोधन करावे अशी मागणी केली आहे.

लाईव्ह लॉ नुसार,  या वर्षीच्या सुरूवातीला दिल्ली उच्च न्यायालयाचे तत्कालिन न्यायाधीश एस मुरलीधर यांनी देखील सर्व वकिलांना अशाच प्रकारचे आवाहन केले होते. 2006 मध्ये बार काउंसिल ऑफ इंडियाने अशा प्रकारच्या शब्दांचा प्रयोग रोखण्यासाठी एक प्रस्ताव देखील सादर केला होता.