4 वर्षांपुर्वी बंद झालेले पैसे घेऊन नेत्रहीन जोडपे बँकेत पोहचले आणि…

तामिळनाडूच्या इरोड जिल्ह्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने माणुसकी दाखवत एका नेत्रहीन दांपत्याची मदत करताना स्वतःच्या खिश्यातील 25 हजार रुपये दिले आहे. नेत्रहीन असल्याने दांपत्याच्या लक्षात आले नाही की त्यांच्याकडे मागील अनेक वर्षांपासून बचत करण्यात आलेली रक्कमेमध्ये 1 हजार आणि 500 रुपयांच्या जुन्या नोटा होता. या नोटा 4 वर्षांपुर्वीच बंद झाल्या आहेत.

अधिकाऱ्यांनुसार, अगरबत्ती विकून पोट भरणारे 58 वर्षीय सोमू आणि त्यांच्या पत्नी पलानीअम्मल यांनी मागील 10 वर्षांपासून बचत केली होती. जेव्हा आपली बचत केलेली रक्कम हे दांपत्य बँकेत गेले तेव्हा त्यांच्याकडे 1 हजार आणि 500 च्या जुन्या नोटा होत्या.

याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी सी कतिरावन यांनी या जोडप्याला 25 हजारांची मदत केली. सोमू यांच्याद्वारे सरकारला मदतीचे आवाहन केल्यानंतर दोन जिल्हाधिकाऱ्यांनी माणुसकी दाखवत त्यांना मदत केली. याशिवाय त्यांना जुन्या नोटा जिल्ह्यातील प्रमुख बँकेत जमा करण्यास सांगितले.

सोमू आणि त्यांच्या पत्नीने या मदतीसाठी अधिकाऱ्यांचे आभार मानले.

Leave a Comment