पायलट यांच्यानंतर कोण?’, असा प्रश्न विचारणाऱ्या काँग्रेस नेत्यालाच डच्चू

पक्षविरोधी कारवाई आणि शिस्तभंग केल्याने संजय झा यांना काँग्रेस पक्षाने निलंबित केले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीने पत्र जारी करत याची माहिती दिली. या आधी जून महिन्यात त्यांना प्रवक्तापदावरून देखील हटविण्यात आले होते.

संजय यांनी ट्विट केले होते की, राजस्थानमध्ये सचिन पायलट यांना मुख्यमंत्री बनवावे. त्यांनी म्हटले होते की, तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या अशोक गेहलोत यांना मोठी जबाबदारी देत जेथे काँग्रस कमकुवत आहे तेथील जबाबदारी द्यावी.

याशिवाय अन्य एका ट्विटमध्ये त्यांनी आधी ज्योतिरादित्य सिंधिया, आता सचिन पायलट नंतर कोण ? असा प्रश्न विचारला होता.

टिव्हीवरील कार्यक्रमामध्ये पक्षाविरोधात बोलल्याने अखेर महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी त्यांना पक्षातून निलंबित केले आहे.

Loading RSS Feed

Leave a Comment