पायलट समर्थक 300 काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

राजस्थानमध्ये काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत सत्तानाट्यानंतर अखेर उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपदावरून सचिन पायलट यांची हकालपट्टी करण्यात आली. आता पायलट यांच्या समर्थनार्थ पक्षातील अनेक नेत्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजस्थानमधील जवळपास 300 पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याचे समोर आले आहे. यात जिल्हा-ब्लॉकच्या अध्यक्षांचा देखील समावेश आहे.

राजस्थानच्या प्रदेश काँग्रेस समितीच्या जवळपास 30 पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस प्रभारी अविनाश पांडेय यांनी प्रदेश कार्यकारिणी, इतर विभाग बर्खास्त करत केली. नवीन अध्यक्षाच्या नियुक्तीसह नवीन प्रदेश कार्यकारिणीच्या सदस्यांची निवड केली जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

राजस्थानच्या एनएसयूआयचे अध्यक्ष अभिमन्यू पूनिया यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजस्थान पीसीसी पूनिया यांचा राजीनामा मंजूर केला असून, अभिषेक चौधरी यांना राजस्थान एनएसयूआयचे नवीन अध्यक्ष बनवले आहे. एनएसयूआयचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि पीसीसीचे सदस्य अनिल चोप्रा यांनी देखील पदाचा राजीनामा दिला आहे.

Leave a Comment