UNSC मधील विजयानंतर पहिल्यांदाच UN ला संबोधित करणार पंतप्रधान नरेंद्र मोदी


नवी दिल्ली – १७ जुलै रोजी संयुक्त राष्ट्रात (UN) अतिशय महत्त्वपूर्ण संबोधन पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या ७५ व्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला पार पडणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करणार आहेत. संयुक्त राष्ट्रातील भारताचे कायम प्रतिनिधी टीएस तिरूमूर्ती यांच्या माहितीनुसार पंतप्रधानांचे हे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील (UNSC) विजयानंतर पहिलेच भाषण असेल. त्यांनी गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात संयुक्त राष्ट्र महासभेला (UNGA) संबोधित केले होते. त्याचबरोबर त्यांनी त्यावेळी आंतरराष्ट्रीय समुदायाला दहशतवादाविरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले होते.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिदेच्या अस्थायी सदस्य म्हणून यावर्षी भारताची दोन वर्षांसाठी निवड करण्यात आली होती. १९२ पैकी १८४ मते भारताला मिळाली होती. अमेरिका, युनायटेड किंगडम. फ्रान्स, रशिया आणि चीन हे या सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्य आहेत. तर त्यांच्याव्यतिरिक्त १० अस्थायी सदस्यदेखील असतात. भारत यापूर्वीही सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य होता. १९५०-५१, १९६७-६८, १९७२-७३, १९७७-७८, १९८४-८५, १९९१-९२ आणि २०११-१२ मध्ये भारताची अस्थायी सदस्य म्हणून निवड झाली होती.

Leave a Comment