या उद्योगपतीने खरेदी केला भारतातील सर्वात महागडा फ्लॅट

स्वतःचे एक घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. त्या घराची किंमत 100 कोटी असल्यावर ? एका उद्योगपतीने मुंबईमध्ये 100 कोटी रुपये किंमतीचे 2 फ्लॅट्स खरेदी केले आहेत. हे फ्लॅट्स मुंबईच्या कार्माइकल रोडवर आहेत. अनुराग जैन यांनी हे फ्लॅट्स खरेदी केले आहेत. ते बजाज कंपनीचे मालक राहुल बजाज यांचे भाचे आहेत. त्यांची स्वतःची ऑटो पार्ट्सची कंपनी आहे.

त्यांनी कार्माइकल रेजीडेंसेसमध्ये दोन फ्लॅट खरेदी केले. हे दोन्ही फ्लॅट एकूण 6371 वर्गफूट आहेत. जैन यांनी 1,56,961 रुपये प्रति वर्ग फूट दराने हा फ्लॅट खरेदी केला. या फ्लॅट्सची मूळ किंमत 46.43 कोटी रुपये होती. मात्र त्यांना रजिस्ट्री आणि स्टँप ड्युटी पकडून 100 कोटी रुपये द्यावे लागले. रजिस्ट्रीची किंमत 1.56 लाख रुपये प्रति वर्ग फूट होती आणि 5 कोटी रुपये स्टँप ड्यूटीसाठी लागले. या सह त्यांना अपार्टमेंटमध्ये 8 पार्किंग देखील मिळाल्या आहेत.  

Image Credited – Aajtak

अनुराग जैन हे अँड्यूरेंस टेक्नोलॉजीचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. त्यांची कंपनी भारत आणि युरोपमध्ये दुचाकी आणि तीनचाकी वाहनांचे पार्ट्स बनवते व पुरवठा करते. कार्माइकल रेजीडेंसेंस 21 मजली इमारत आहे. यात केवळ 28 फ्लॅट्स आहेत. एका मजल्यावर केवळ दोनच फ्लॅट आहेत. फ्लॅट्सच्या मध्यभागी 2000 वर्ग फूट जागा आहे. इमारतीचे सध्या काम सुरू आहे.

Image Credited – Aajtak

या फ्लॅट्समधून एका बाजूला समुद्र तर दुसऱ्या बाजूला संपुर्ण शहराचे दृष्य दिसते. इमारतीमध्ये सोलर पॅनल, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सीवरेज ट्रीटमेंट फ्लॅन सारख्या सुविधा आहेत. याशिवाय छतावर मोठे गार्डन आणि इन्फिनिटी पूल देखील आहे. हा भारतातील सर्वात महागडा फ्लॅट्स असल्याचे देखील सांगितले जाते.

Leave a Comment