नवीन जनरेशन होंडा सिटी भारतात लाँच, जाणून घ्या किंमत

जापानी कार कंपनी होंडाने आपली नवीन जनरेशन सिटी सेडानला अखेर बाजारात उतरवले आहे. कारला पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही इंजिन पर्यायासह लाँच करण्यात आले आहे. कारची किंमत 10.89 लाख रुपयांपासून सुरू आहे. पेट्रोल मॅन्युअल आणि सीव्हीटीचे 3-3 व्हेरिएंट्स आहेत. ज्यांची किंमत 14.44 लाख रुपयांपर्यंत जाते. डिझेल व्हेरिएंट्सबद्दल सांगायचे तर याची किंमत देखील 12.39 लाख ते 14.64 लाख रुपये आहे.

कारच्या सर्वात स्वस्त व्ही व्हेरिएंट्सच्या फीचरबद्दल सांगायचे तर यात तुम्हाला अलेक्साशिवाय टच-स्क्रीन सिस्टम, पॅडल शिफ्ट 4 एअरबॅग आणि क्रूज कंट्रोल देखील मिळेल. व्हीएक्स व्हेरिएंटमध्ये 6 एअरबॅग्स, सनरूफ, 7 इंच टीएफटी मीटर आणि 16 इंच एलॉय व्हिल मिळेल. सर्वात महागड्या झेडएक्स व्हेरिएंट्समध्ये या सर्व फीचर्ससह लेन वॉच कॅमेरा, 9 एलईडी हेडलँम्प आणि लेदर सीट्सचा आनंद मिळेल.

Image Credited -HT Auto

 नवीन जनरेशन होंडा सिटीसोबत फुल एलईडी हेडलँप्स, इंटीग्रेटेड डीआरएल आणि एल-शेप एलईडी टर्न सिग्नल देण्यात आले आहे. कारच्या मागील बाजूला झेड-शेप रॅपराउंड एलईडी टेललाइट्ससोबत साइड मार्कर लँम्पस देण्यात आले आहेत. कारच्या कॅबिनमध्ये डॅशबोर्डसाठी पुर्णपणे नवीन लेआउट देण्यात आले आहे. कॅबिनला ड्यूअल टोनच्या ऐवजी बेल बॅल्क फिनिश देण्यात आले आहे.

Image Credited – Overdrive

फीचर्सबद्दल सांगायचे तर नवीन जनरेशन होंडा सिटीमध्ये 8 इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट स्क्रीनसह अ‍ॅपल कारप्ले आणि अँड्राईड ऑटो, इंस्ट्रूमेंट क्लस्टरसाठी 7 इंच डिजिटल डिस्प्ले मिळेल. फुटवेलसाठी एलईडी लँम्पस आणि एंबियंट लाईटिंग मिळेल. कारणमध्ये वन-टच स्टार्ट/स्टॉप, कीलेस एंट्री, रिमोट इंजन स्टार्ट, इलेक्ट्रिक सनरूफ, ऑल ऑटो पावर विंडो, रियर सनशील्ड, स्टेअरिंग माउंटेड पॅडल शिफ्टर, ऑटो हेडलँप्स आणि फॉलो-मी-होम लाइट्स सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. कारमध्ये कनेक्टेड कार तंत्रज्ञान देण्यात आले आहे. ही भारताची पहिली कार आहे, ज्यात अ‍ॅलेक्सा रिमोट कंपेटिबलिटी मिळेल.

Image Credited – CarDekho

कंपनीने पुष्टी केली आहे की 2020 सिटी बीएस-6 मानक पेट्रोल-डिझेल इंजिनमध्ये येईल. कारसोबत नवीन1.5-लीटर आय-व्हीटेक पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे, जे 6600 आरपीएमवर 119 बीएचपी पॉवर आणि 4300 आरपीएमवर 145 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल आणि सीव्हीटी यूनिटसोबत सुसज्ज असेल. याशिवाय 1.5-लीटर आय-डीटेक डिझेल इंजिन देखील मिळेल. जे 3600 आरपीएमवर 99 बीएचपी पॉवर आणि 1750 आरपीएमवर 200 एनएम पीक टॉर्क जनरेट करते.

Leave a Comment