अमेरिकेतील एका 6 वर्षीय चिमुकल्याने अशी कामगिरी केली आहे, ज्याचे सर्वच स्तरातून भरभरून कौतुक होत आहे. 6 वर्षीय भावाने आपल्या लहान बहिणीला कुत्र्यांपासून वाचवत बहादुरी दाखवली आहे. या घटनेत तो स्वतः जखमी झाला. त्याला 90 टाके लागले. मात्र त्याने आपल्या बहिणीला काहीही होऊ दिले नाही.
A post shared by Nikki Walker (@nicolenoelwalker) on
निक्की वॉकरने आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये या चिमुकल्याच्या शौर्याची माहिती दिली आहे. 9 जुलैला 6 वर्षीय ब्रिजर वॉकरने कुत्र्यांपासून आपल्या बहिणीला वाचवले. बहिणीला वाचवताना कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला. त्याने आपल्या बहिणीचा हात पकडला व पळू लागला. कुत्र्यांनी एवढा भयानक हल्ला केला की, या चिमुकल्याच्या चेहऱ्याला 90 टाके लागले.
ब्रिजरला जेव्हा विचारले की, तुला भिती वाटली नाही का ? यावर तो म्हणाला की जर कोणाचा मृत्यू झाला असता, तर तर मी ठरवले की तो मीच असावा. सध्या ब्रिजरच्या चेहऱ्याला टाके लावले असून, तो आता बरा आहे. या चिमुकल्याच्या बहादुरीचे सर्वचजण कौतुक करत आहेत.