आता चक्क कागदाच्या बाटल्यांमध्ये मिळणार या कंपनीची दारू

जवळपास 200 वर्ष जुनी व्हिस्की जॉनी वॉकर आता कागदाच्या बाटलीमध्ये मिळणार आहे. कंपनी आपल्या सर्व ब्रँडमधील प्लास्टिक कमी करण्यासाठी कागदाचा वापर करण्यावर जोर देत आहे. जेणेकरून पर्यावरणाला हानी पोहचणार नाही. बिअर कंपनी कार्ल्सबर्गने देखील अशीच घोषणा केली आहे. एका अंदाजानुसार केवळ युरोपमध्ये वर्ष 2018 मध्ये फूड आणि ड्रिंक प्रोडक्ट्सच्या पॅकिंगमध्ये जवळपास 82 लाख टन प्लास्टिकचा वापर करण्यात आला. अशामध्ये पेय कंपन्यांचे हे पाऊल कौतुकास्पद आहे.

सर्वसाधारपणे सर्व मोठ्या दारू कंपन्या काचेच्या बाटल्यांचा वापर करतात. मात्र काचेच्या बाटल्या बनविण्यासाठी अधिक मेहनत लागते. सोबतच यामुळे कार्बन उत्सर्जन देखील वाढते. त्यामुळे कंपनीने कागदाच्या बाटल्यांचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.

कंपनीचे मालक डियाजियोने सांगितले की, या बाटल्या पल्पच्या साच्यामध्ये टाकल्या जातील व त्यानंतर मायक्रोव्हेववर भाजल्या जातील. यात आतून थर चढवला जाईल, जेणेकरून ड्रिंक कागदातून गळू नये. अनेक कार्टन जे कागदापासून बनतात, त्यात आत प्लास्टिकचा मुलामा चढवलेला असतो. मात्र डियाजिओंचे म्हणणे आहे की या बाटल्यांमध्ये कोणत्याही प्रकारच्या प्लास्टिकचा वापर केला जाणार नाही.

कंपनी कागदाच्या बाटल्यांच्या निर्मितीसाठी पल्पेक्स नावाने आणखी एका कंपनीची स्थापना करत आहे. ही कंपनी पेप्सिको आणि यूनिलिव्हर सारख्या ब्रँडसाठी देखील कागदाच्या बाटल्या बनवेल. कंपनीचे म्हणणे आहे की, कागदाच्या बाटल्या वुड पल्प म्हणजेच लाकडाच्या लगद्यापासून बनवल्या जातील. याचे परीक्षण वर्ष 2021 मध्ये केले जाईल. या बाटल्यांना पुर्णपणे रिसायकल केले जाईल.

Leave a Comment