इस्त्रायल नेचर पार्कने लोकांना केले झाडांना मिठी मारण्याचे आवाहन; पण का ?

कोरोना व्हायरसने आपले दैनंदिन आयुष्य पुर्णपणे बदलून टाकले आहे. स्थिती अशी झाली आहे की, एखाद्या व्यक्तीची गळाभेट घेण्याआधी 10 वेळा विचार करावा लागतो. खास कोरोनामुळे आपल्या कुटुंबापासून लांब असणाऱ्यांची स्थितीतर अधिक अवघड आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही झाडांना मिठी मारून आपले दुःख कमी करू शकता.

इस्त्रायलचे नेचर अँड पार्क अथॉरिटी लोकांना झाडांना मिठी मारण्याचे आवाहन करत आहे. येथील प्रशासनानुसार कोव्हिड-19 मध्ये एकटे राहण्यापेक्षा निसर्गाशी जोडले जा आणि एक खास अनुभव मिळवा. अपोलिनिया नॅशनल पार्कमध्ये प्राधिकरणाचे मार्केटिंग संचालक ओरिट स्टेइनफिल्ड यांचे म्हणणे आहे की, या कठीण काळात आम्ही जगभरातील लोकांना निसर्गाची भटकंती करणे, दीर्घ श्वास घेणे, झाडे लावणे, प्रेम व्यक्त करणे प्रेम मिळवण्याचा सल्ला देतो.

तेल अवीवपासून 15 किमी लांब या पार्कमध्ये प्रशासनाने लोकांना झाडांना मिठी मारण्यास सांगितले आहे. पार्कमध्ये येणाऱ्या लोकांचे म्हणणे आहे की, या दिवसांमध्ये ते आपल्या कुटुंबातील सदस्यांना मिठी मारू शकत नाही. अशा स्थितीमध्ये झाडांना मिठी मारणे निश्चितच चांगला अनुभव आहे.

Leave a Comment