कोरोना : मुलांना तणावमुक्त ठेवण्यासाठी डब्ल्यूएचओने पालकांना दिल्या विशेष सूचना

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून, आतापर्यंत यामुळे लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे लहान मुले देखील घरात कैद झाली आहेत. त्यांना ना बाहेर जाता येत आहे, नाही मित्र-मैत्रिणींना भेटता येत आहे. अशा स्थितीमध्ये लहान मुले तणावग्रस्त होणे स्वभाविक आहे. या कठीण काळात लहान मुलांची काळजी कशी घ्यावी ही पालकांची जबाबदारी आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने काही सुचना दिल्या आहेत, ज्याच्या मदतीने पालक आपल्या मुलांना तणावमुक्त ठेऊ शकतात.

  • डब्ल्यूएचओनुसार, पालकांनी मुलांना लक्षपुर्वक ऐकावे. त्यांच्यावर अधिक प्रेम करा व त्यांची अधिक काळजी घ्या.
  • कोव्हिडपासून मुलांना लांब ठेवण्यासाठी त्यांना कुटुंबाच्या अधिक जवळ ठेवा.
  • मुलांसाठी एक नियमित दिनक्रम बनवा. एक चांगले वातावरण तयार करा. अभ्यास, खेळणे याशिवाय त्यांना आराम देखील करू द्या.
  • मुलांच्या खाण्या-पिण्याची विशेष काळजी घ्या. त्यांच्या वयानुसार त्यांना कोव्हिड-19 बाबत सविस्तर माहिती द्या.
  • कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी स्वतःची काळजी घ्या आणि विशेष करून मुलांची काळजी घ्या.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment