चीनला मोठा झटका, आता ब्रिटनने ह्युवोईला केले 5जी नेटवर्कमधून बाहेर

ब्रिटनने अमेरिकेच्या दबावापुढे झुकत आणि चीनच्या चेतावणीकडे दुर्लक्ष करत आपल्या 5जी नेटवर्कमधून चीनची दिग्गज कंपनी ह्युवोईला टप्प्या टप्प्याने हटविण्याचे आदेश दिले आहेत. ह्युवोईला अशाप्रकारे 5जी नेटवर्कमधून बाहेर करणे चीनसाठी मोठा झटका आहे.

या निर्णयावर व्हाईट हाऊसने म्हटले की, हा निर्णय या गोष्टीचे संकेत देतो की आतंरराष्ट्रीय स्तरावर ह्युवोई आणि याप्रकारे बिगरविश्वासू विक्रेता राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करतात. कारण ते चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या बाजूने निष्ठा ठेवतात. या आधी अमेरिकेने राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचे सांगत ह्युवोईवर बंदी घातली होती.

ब्रिटनच्या या निर्णयाने चीनसोबतच्या त्यांच्या संबंधांवर परिणाम होऊ शकतो. याशिवाय मागील 20 वर्षांपासून ह्युवोईची सेवा वापरणाऱ्या ब्रिटनच्या ग्राहकांना याची किंमत चुकवावी लागू शकते. ह्युओने या निर्णयाला राजकीय म्हटले आहे. यामुळे ब्रिटनची डिजिटल सेवा हळू होईल, असे कंपनीने म्हटले आहे.

Leave a Comment