यामुळे अ‍ॅपलने सॅमसंगला दिला 7100 कोटींचा दंड

भलेही स्मार्टफोन मार्केटमध्ये अ‍ॅपल आणि सॅमसंग प्रतिस्पर्धी असले तरी अनेकांना माहिती नाही की अ‍ॅपल आपल्या आयफोनसाठी सॅमसंगकडून डिस्प्ले खरेदी करते. मात्र कमी डिस्प्ले खरेदी केल्याने सॅमसंगला दंड भरावा लागला आहे. रिपोर्टनुसार डिस्प्ले सप्लाय चेन कंसल्टेंटच्या रिपोर्टमध्ये ही माहिती समोर आली आहे.

रिपोर्टनुसार, अ‍ॅपलने सॅमसंगला तब्बल 950 मिलियन डॉलर (जवळपास 7156 कोटी रुपये) दंड दिला आहे. सॅमसंग अ‍ॅपलला ओलेड डिस्प्लेचा पुरवठा करते. दंडाच्या रक्कमेमुळे सॅमसंग कंपनीच्या डिस्प्ले बिझनेसचे दुसऱ्या तिमाहीतील उत्पन्न वाढले. एवढेच नाही तर तोट्यात चाललेल्या कंपनीला नफा झाला आहे.

या आधी देखील मागील वर्षी कमी डिस्प्ले पॅनेल खरेदी केल्याने अ‍ॅपलला मोठा दंड द्यावा लागला होता. त्यावेळी कंपनीने सॅमसंगला 684 मिलियन डॉलर दंड दिला होता. रिपोर्टनुसार दोन्ही कंपन्यांमध्ये ठराविक डिस्प्ले खरेदी करण्याचा करार झाला आहे. कमी डिस्प्ले पॅनेल्स खरेदी केल्यावर अ‍ॅपलला दंड भरावा लागतो.

Leave a Comment