एअरटेलची धमाकेदार ऑफर, या युजर्सला मिळणार तब्बल 1,000 जीबी मोफत डेटा

एअरटेल एक्सट्रीम फायबर युजर्ससाठी आनंदाची बातमी आहे. कंपनी लेनोवा नोटबूक खरेदी करणाऱ्या युजर्सला मोफत 1000जीबी डेटा ऑफर करत आहे. एअरटेल एक्सट्रीम सध्या देशातील सर्वोत्तम फायबर इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर्स पैकी एक आहे. स्बस्क्राइबर बेस वाढविण्यासाठी कंपनी नवनवीन आणि आकर्षक ऑफर देत आहे.

ओनली टेक आणि टेलिकॉम टॉकच्या रिपोर्टनुसार, 1000 जीबी फ्री डेटा एअरटेल लेनोवाच्या बॅक टू स्कूल ऑफर अंतर्गत दिला जात आहे. ऑफरचा लाभ घेण्यासाठी युजर्सला लेनोवा नोटबुक खरेदी करावे लागेल. 11 जुलैपासून सुरू झालेली ही ऑफर 31 ऑगस्टपर्यंत चालेल. ऑफरचे क्लेम करण्यासाठी युजरला आपल्या खरेदी केलेल्या प्रोडक्टला व्हेरिफाय करावे लागेल. याशिवाय ज्या युजर्सच्या भागात एअरटेल एक्स्ट्रीम सर्व्हिस उपलब्ध आहे, अशांसाठीच ही ऑफर कामाची आहे.

युजर्सला महिन्याच्या प्लॅनची सुरूवात करण्यासाठी 1 हजार रुपये द्यावे लागलीत. ही ऑफर कॉपर वायर कनेक्शन युज करणाऱ्या युजर्ससोबतच फायबर वायर कनेक्शन असणाऱ्या युजर्ससाठी देखील आहे. कंपनी 3, 6 आणि 12 महिन्यांच्या प्लॅन खरेदी करणाऱ्यांना मोफत एक्टिव्हेशन देत आहे. या प्लॅनमध्ये देखील बिलावर 7.5 ते 15 टक्के सूट मिळेल. युजरला मोफत मिळेला 1 हजार जीबी डेटाचा कालावधी 6 महिने असेल.

Leave a Comment