एअर इंडिया आपल्या कर्मचाऱ्यांना जबरदस्ती पाठवणार सुट्टीवर

कोरोना व्हायरसमुळे एव्हिएशन सेक्टरवर मोठा परिणाम झाला आहे. आधीपासूनच संकटात असलेली एअर इंडियाची स्थिती आता अधिकच बिकट झाली आहे. एअरलाईन कामगार कपातसह काही कामगारांना जबरदस्ती सुट्टीवर (Leave Withouth Pay) पाठवणार आहे.  संकटातून बाहेर येण्यासाठी आणि खर्च कमी करण्यासाठी एअऱलाईनने हे पाऊल उचलले आहे.

नवभारत टाईम्सनुसार, एअर इंडिया 6 महिने ते 2 वर्षापर्यंत कर्मचाऱ्यांना सुट्टीवर पाठवू शकते. हा कालावधी 5 वर्षांपर्यंत देखील वाढू शकतो. कोणत्याही कर्मचार्‍याचे योग्य मूल्यांकन करुन एअरलाइन्सची गरज, स्थिती आणि क्षमता पातळीवर आधारित सुट्टीवर पाठविण्याचा अधिकार व्यवस्थापनाला आहे.

एअर इंडियाच्या हेडक्वार्टरमध्ये वरती दिलेल्या गोष्टींच्या आधारावर प्रत्येक कर्मचाऱ्याचे मुल्यांकन केले जात आहे. कर्मचाऱ्यांची एक यादी तयार केली जाणार आहे. मुल्यांकना दरम्यान कंपनी पाहणार की कर्मचारी किती उपयुक्त आहे.

रिजनल डायरेक्टर्स आणि डिपार्टमेंटल हेडला 15 ऑगस्टपर्यंत ही यादी पाठवण्यास सांगितले आहे. दरम्यान एअर इंडियामध्ये 13 हजार कायमस्वरूपी कर्मचारी काम करतात. यांचा महिन्याचा पगार 230 कोटी रुपये आहे.

Leave a Comment