दिवसातून एवढे तास गेम खेळायचा हा युवक, हाताने काम करणे केले बंद

जगभरात कोरोना व्हायरसचे संकट आहे. तर अशा संकटात घरात असलेली मुलं तासंतास मोबाईल, कॉम्प्युटरवर गेम खेळत असल्याने पालक चिंतेत आहेत. चीनमध्ये एका 15 वर्षीय मुलाचा हात तासंतास गेम खेळल्याने पॅरालाइज्ड झाला. हे प्रकरण दक्षिण चीनमधील असून, येथे राहणारा Xiaobin दिवसाचे 22 तास गेम खेळत असे व केवळ 2 तास झोपत असे. यामुळे त्याची प्रकृती बिघडली आणि त्याला स्ट्रोक आला.

युवकाच्या आईने त्याला स्मार्टफोन घेऊन दिला होता, जेणेकरून तो शाळेचा अभ्यास करू शकेल. मात्र फेब्रुवारीमध्ये ऑनलाईन क्लासेससह ऑनलाईन व्हिडीओ गेमची देखील सवय लागली. Xiaobin ला हा स्ट्रोक मार्चमध्ये आला होता. मागील 4 महिन्यापासून त्याच्यावर नानगिंगच्या गुआंग्शी जियांगबिन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

युवकाच्या आईने काही दिवसांपुर्वी एका टिव्ही चॅनेलला सांगितले की, मी आणि पती सकाळी कामाला निघून जायचो व संध्याकाळी 6 वाजता घरी यायचो. तो एकटाच घरी असे. त्याने रात्री देखील फोनचा वापर करणे सुरू केले. विचारल्यावर, शाळेसंबंधी काहीतरी करत आहे, असे सांगायचा. त्याने स्वतःला खोलीत बंद करून घेतले होते. दिलेले जेवण देखील संध्याकाळपर्यंत तसेच असे. महिनाभर तो ड्रिंक्स आणि स्नॅक्सच खात होता. 1 मार्चला तो बेशुद्ध झाला. आम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये भरती केले. तेथे सिटी स्कॅन केल्यावर स्ट्रोक आल्याचे समजले.

न्यूरोलॉजिस्टने सांगितले की, त्याला एका वाईट दिनचर्याची सवय लागली होती. त्याने स्नॅकशिवाय दुसरे सर्व खाणे सोडून दिले होते. त्याच्या पोषक तत्वासह मस्तिष्कमध्ये रक्त आणि ऑक्सिजनची कमतरता झाली होती, ज्यामुळे त्याला स्ट्रोक आला. उपचारानंतर आता युवक आपल्या डाव्या हाताचा आणि अंगठ्याची पुन्हा हालचाल करू शकत आहे.

Leave a Comment