मुंबईतील लोकलमध्ये ‘क्यूआर’ कोड नसेल तर मिळणार नाही एंट्री


मुंबई : कोरोना संकटाची तीव्रता अद्याप कमी झाली नसल्यामुळे देशासह राज्यातील लॉकडाऊन कायम आहे. त्यातच देशातील काही राज्यांमध्ये लागू असलेल्या लॉकडाऊनमध्ये बऱ्याच प्रमाणात शिथिलता देत अनलॉक करण्यात आले आहे. तसेच देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात सरकारी आणि अत्यावश्यक सेवेसाठी काही विशेष लोकल गाड्या चालविण्यात येत आहे. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आता लोकलमधून प्रवास करणाऱ्यांसाठी ‘क्यूआर’ महत्वाचा बनला आहे, कारण क्यूआर कोड नसेल तर लोकलमध्ये प्रवेश करता येणार नाही, असे धोरण रेल्वेने लागू केले आहे.


राज्य सरकारच्या मागणीनुसार १५ जूनपासून अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी उपनगरीय सेवा सुरु करण्यात आली आहे. पण या गाड्यामध्ये कोणीही प्रवेश करत असल्यामुळे ‘सोशल डिस्टन्सिंग’चा अक्षरशः फज्जा उडाला होता. या सगळ्यांना आवरणे अधिकारी वर्गालाही कठिण झाल्यामुळे रेल्वे प्रशासनाने राज्य सरकारकडे ‘क्यूआर’ कोड असलेली ओळखपत्र द्यावीत अशी मागणी केली होती. त्यामुळे आता पश्चिम रेल्वेने २० जुलैपासून ‘क्यूआर’ कोडची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘क्यूआर’ कोडची ओळखपत्र मध्य रेल्वेने दिल्यामुळे ने प्रवाशांसह सुरक्षा रक्षकांचाही फायदा असल्याचे राज्य सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना ते लवकर द्यावे अशी मागणी गेली आहे.


उपनगरीय रेल्वे स्थानकांवर मेट्रोप्रमाणे अॅक्सेस कंट्रोल सिटीम नसल्याने कोणीही कुठल्याही शॉर्टकटने रेल्वे स्थानकांत पोहचता येते, तसेच ओळखपत्र तपासण्यास रेल्वेच्या सुरक्षा रक्षक आणि टीसींना ‘कोरोना’चा धोका असल्यामुळे राज्य सरकारकडे रेल्वेने ‘क्यूआर’ कोड असलेली ओळखपत्रे देण्याची मागणी पालिका आयुक्तांशी झालेल्या बैठकीच्यावेळी केली होती. यावेळी ‘क्यूआर’ कोड ओळखपत्रे देण्याचे आश्वासनही राज्य सरकारकडून दिले होते. त्यानंतर आता पश्चिम रेल्वेने २० जुलैपासून ‘क्यूआर’ कोडच्या ओळखपत्रांनाच लोकलमध्ये प्रवेश देण्याचे जाहीर केल्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांकडे ‘क्यूआर’ कोडचे ओळख पत्र नसेल तर त्यांना लोकलमध्ये प्रवेश मिळणार नाही, असे स्पष्ट केले आहे.

Leave a Comment