देशातील कोरोनाबाधितांच्या आकड्याने ओलांडला ९ लाखांचा टप्पा


नवी दिल्ली – संपूर्ण जगावर ओढावलेल्या कोरोना संकटाचा प्रादुर्भाव देशात दिवसेंदिवस वाढत असून त्यातच आता देशातील कोरोनाबाधितांच्या आकड्याने आता ९ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. देशभरात काल दिवसभरात २८ हजार ४९८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर कोरोनामुळे ५५३ जणांनी आपला जीव गमावला आहे.

देशभरातील कोरोनाबाधितांचा आकडा आता आता ९ लाख ६ हजार ७५२ वर पोहचला आहे. यामध्ये अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३ लाख ११ हजार ५६५ असून, आतापर्यंत ५ लाख ७१ हजार ४६० जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. तर आतापर्यंत देशभरात २३ हजार ७२७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. देशभरात १ कोटी २० लाख ९२ हजार ५०३ नमूण्यांची १३ जुलैपर्यंत तपासणी केली गेली आहे. यातील २ लाख ८६ हजार २४७ नमूने काल(सोमवार) तपासण्यात आल्याची माहिती ‘आयसीएमआर’ कडून देण्यात आली आहे.

Leave a Comment