देशातील काही शहरांमध्ये आज दिसू शकणार इंटरनॅशनल स्पेस स्टेशन


नवी दिल्ली – अवकाशात घडणाऱ्या विविध घटनाची माहिती जाणून घेण्यासाठी वैज्ञानिक नेहमी वेगवेगळे प्रयोग करत असतात. पण यासाठी त्यांनी एका स्पेस स्टेशनाचा वापर करावा लागतो आणि अशाच प्रकारच्या इंटरनॅशनल स्पेश स्टेशनबद्दल तुम्ही कधीतरी ऐकले देखील असेल. पण हेच स्पेस स्टेशन पाहायची संधी जर तुम्हाला मिळतील, तर ती तुमच्यासाठी पर्वणी ठरु शकते. आज पृथ्वीवरुन तुम्ह अगदी सहजपणे हे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन पाहू शकता. सूर्य आणि चंद्रानंतर इंटरनॅशनल स्पेस स्टेशन हे अवकाशातील तिसरा प्रकाशमान ऑब्जेक्ट असल्यामुळे तुम्ही पृथ्वीवरुन हा अवकाश तळ सहजतेने पाहू शकता.

फक्त त्यावेळी स्वच्छ आकाश आणि वेळ या दोन गोष्टी जुळून आल्या म्हणजे तुम्हाला इंटरनॅशनल स्पेस स्टेशनचे दर्शन घडू शकते. भारतातील काही शहरातूनही आज हे स्पेस स्टेशन पाहता येणार आहे. गुजरातमधील राजकोट, अहमदाबाद, राजस्थानातील जयपूर आणि दिल्ली या शहरातून आज हे स्पेस स्टेशन पाहता येईल, असे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.

अवकाशात इंटरनॅशनल स्पेस स्टेशनचे भ्रमण सुरु असते. भारतातील काही शहरांरुन हे स्पेस स्टेशन आज जाणार आहे. रात्री ८.३५ च्या सुमारास अहमदाबाद, राजकोटमध्ये तर ८.३७ च्या सुमारास हे स्पेस स्टेशन जयपूर, दिल्लीमध्ये पाहता येईल. हे स्पेस स्टेशन अहमदाबाद, राजकोट, जयपूर, दिल्ली या चार शहरांमध्ये सहा मिनिटांसाठी दिसणार आहे. स्पेस स्टेशन हे आकाशातील तिसरे प्रकाशमान ऑब्जेक्ट आहे.

एखादा तारा कसा दिसतो, तशा स्वरुपात हे स्पेस तुमच्या डोळयांना स्टेशन दिसेल. पण ताऱ्यांच्या तुलनेत स्पेस स्टेशन खूप प्रकाशमान दिसेल. या स्पेस स्टेशनचे उड्डाण विमानासारखे असेल पण वेग प्रचंड असेल. वर उल्लेख केलेल्या शहरांमध्ये जर तुम्ही असाल तर, आकाशात प्रकाशमान ताऱ्यासारखी वस्तू उड्डाण करताना तुम्ही पाहू शकता.

Leave a Comment