तब्बल आठवड्याभरानंतर बोटिंगला गेलेल्या अभिनेत्रीचा मृतदेह सापडला


८ जुलै रोजी सकाळी कॅलिफोर्नियातील पिरु तलावात बोटिंगसाठी गेलेल्या ३३ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्री नाया रिवेराचा तब्बल आठवड्यानंतर तिचा मृतदेह सापडला आहे. या तलावात फिरताना ती अचानक गायब झाली होती. तिचा मृतदेह या तलावाच्या ईशान्य भागात सापडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

नायासोबत बोटिंग करताना तिचा चार वर्षांचा मुलगादेखील होता. बोटीमधून तिचा मुलगा किनाऱ्यावर परतला, पण नाया गायब झाली होती. बोटीतून आई आणि मी फिरायला गेलो होतो. तलावात गेल्यावर आम्ही दोघांनी पाण्यात पोहण्यासाठी उडी मारल्यानंतर आईने मला पुन्हा बोटीत चढण्यासाठी मदत केली. पण बोटीत आल्यावर जेव्हा मी मागे वळून पाहिले तेव्हा माझ्यासोबत आई नसल्याची माहिती तिच्या चार वर्षीय मुलाने दिली.

नायाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. नाया बेपत्ता झाल्याची माहिती कळताच आठवडाभरापासून पोलीस स्कूबा एक्स्पर्ट आणि हॅलिकॉप्टर्सच्या साहाय्याने तिचा शोध घेत होते. नायाच्या अशा अचानक मृत्यूमळे हॉलिवूड सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Loading RSS Feed

Leave a Comment