मुंबई पोलीस बंद करणार सुशांतच्या आत्महत्येची फाईल ?


अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला आज एक महिना पूर्ण झाला असून या प्रकरणी अद्याप मुंबई पोलिसांच्या हातात काहीही लागलेले नाही. अनेकांचे जबाब याप्रकरणी नोंदवल्यानंतरही काही ठोस पुरावे अद्याप पोलिसांना मिळालेले नाहीत. तरीदेखील सातत्याने मुंबई पोलिस तपास करत आहेत, पण याच दरम्यान सीबीआय चौकशीची मागणी सोशल मीडियावर जोर धरत आहे.
दरम्यान राजस्थान पत्रिकाने दिलेल्या वृत्तानुसार या प्रकरणाची फाईल मुंबई पोलीस बंद करणार असल्याची माहिती आहे. काही दिवसांत ही केस फाईल बंद करण्याच्या दिशेने सुशांत आत्महत्याप्रकरणाचा तपास करणार्‍या मुंबई पोलिसांनी पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्या अंतिम अहवालाकडे पोलिस याप्रकरणी वाटचाल करत आहेत.

मुंबई पोलिसांना सुशांतची आत्महत्या नसून खून असल्याचे कोणताच पुरावे मिळालेले नाही. पुरावे नसल्यामुळे आणि तपासात जे उघड झाले आहे त्या आधारे पोलीस त्यास आत्महत्या मानत असल्यामुळेच मुंबई पोलीस फाईल बंद करण्याच्या दिशेने पाऊल उचलत आहेत. चौकशीदरम्यान सुशांत आर्थिक संकटात सापडला होता आणि तो खूप अस्वस्थ होता, हे स्पष्ट झाले आहे.

Leave a Comment