सरकारी बंगल्यावरून प्रियंका गांधी-हरदीप सिंग पुरी यांच्यात ‘ट्विटर वॉर’

काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांच्या सरकारी बंगल्याबाबत केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी मोठा खुलासा केला आहे. हरदीप पुरी यांनी ट्विट करत दावा केला की, एका वरिष्ठ काँग्रेस नेत्याने प्रियंका गांधी यांचा सरकारी बंगला दुसऱ्या काँग्रेस खासदाराला देण्याची विनंती केली होती. यावर आता प्रियंका गांधी यांनी उत्तर दिले आहे.

पंतप्रधान मोदींनी प्रियंका गांधी यांना त्यांचा सरकारी बंगला आणखी काही दिवस ठेवण्याची परवानगी दिली असल्याची माहिती समोर आली होती. प्रियंका गांधी यांनी यासाठी परवानगी मागितली होती, असे वृत्त काही माध्यमांनी दिले होते. यावर प्रतिक्रिया देत गांधी यांनी ही माहिती खोटी असल्याचे म्हणत मी कोणत्याही प्रकारची विनंती केली नसल्याचे म्हटले होते.

प्रियंका गांधींच्या या ट्विटला केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी रिट्विट करत दावा केला की, तथ्य स्वतः बोलते. एका शक्तिशाली काँग्रेस नेत्याने मला 4 जुलै 2020 ला दुपारी 12.5 वाजता विनंती केली की, 35, लोधी स्टेट बंगल्याला दुसऱ्या एका काँग्रेस खासदाराला देण्यात यावे, जेणेकरून प्रियंका गांधी वाड्रा तेथे राहू शकतील. सर्वकाही सनसनाटी बनवू नका.

यानंतर प्रियंका गांधी यांनी पुन्हा हरदीप सिंग पुरी यांना उत्तर देत लिहिले की, जर तुम्हाला कोणी असे म्हटले असेल तर मी त्यांच्या चिंतेसाठी धन्यवाद देते. सोबतच तुमच्या विचारांसाठी देखील धन्यवाद. मात्र हे देखील तथ्य बदलत नाही की मी अशी कोणतीही विनंती केली नाही व अशी कोणती विनंती ही करणार नाही. मी 1 ऑगस्टपर्यंत घर खाली करेल.

यानंतर पुन्हा हरदीप सिंग पुरी यांना पुन्हा आपला तोच मुद्दा मांडत. उच्च काँग्रेस नेत्याने अशी विनंती केली होती, असे म्हटले.

दरम्यान, सरकारने प्रियंका गांधी यांना आपला सरकारी बंगला खाली करण्यास सांगितले आहे. एसपीजी सुरक्षा हटवल्याने त्यांना 1 ऑगस्टपर्यंत हा बंगला खाली करायचा आहे.

Leave a Comment