कोरोनापासून वाचण्यासाठी हे जोडपे चक्क पृथ्वीवर घालते ‘स्पेस सूट’

कोरोना व्हायरसने ब्राझीलमध्ये थैमान घातले आहे. मात्र दुसरीकडे सोशल मीडियावर एक ब्राझिलियन जोडपे सध्या विशेष चर्चेत आहे. याचे कारण आहे, त्यांचे स्पेस सूट घालून पृथ्वीवर फिरणे. हे जोडपे ब्राझीलच्या रियो डे जेनेरियो समुद्र किनाऱ्यावर स्पेस सूट घालून चालते. इंटरनेटवर त्यांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. खास गोष्ट म्हणजे कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी हे जोडपे असे करत आहे.

रॉयटर्स इंडिया वृत्त संस्थेने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की हे जोडपे स्पेस सूटमध्ये समुद्र किनाऱ्यावर फिरत आहे व आजुबाजूची लोक आश्चर्याने त्यांच्याकडे बघत आहेत. काही लोकतर त्यांच्यासोबत सेल्फी देखील काढतात.

Image Credited- indianexpress

66 वर्षीय टेरेसियो ग्लडिनो एक अकाउंटेंट आहेत. त्याने हे सूट खरेदी केले आहेत. या सूटसाठी हेल्मेट त्यांनी स्वतः तयार केले आहेत. आधी त्यांची पत्नी हा सूट घालून सार्वजनिक ठिकाणी जाण्यास नकार देत असे, मात्र अखेर त्या देखील हा सूट घालून सार्वजनिक ठिकाणी येण्यास तयार झाल्या.

Leave a Comment