सक्रिय झाली बारावीच्या निकालाची लिंक


पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या निकालाची लिंक सक्रिय झाली असली तरी अद्याप निकाल कधी जाहिर होणार याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

बोर्ड बारावीच्या 2020 परीक्षेचा निकाल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ १५ जुलैपर्यंत जाहीर करेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरवर्षी मे महिन्याचा शेवटच्या आठवड्यात बारावीच्या परीक्षेचा निकाल हा जाहीर केला जातो. पण यंदा कोरोना संकट आणि लॉकडाऊनमुळे याला बराच उशीर झाला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले होते की, १५ ते २० जुलै दरम्यान १२वीचा निकाल जाहीर केला जाईल. आपण mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन बारावीच्या परीक्षेचा निकाल पाहू शकता. यावेळी तुम्हाला आपला रोल नंबर आणि आईचे नाव टाकून ऑनलाइन निकाल पाहता येईल. दरम्यान, बारावीचा निकाल हा एसएमएसद्वारे देखील पाहता येणार आहे.

Leave a Comment