तोट्यात असतानाही ४० हजार तरुणांना रोजगार देणार टाटांची TCS


नवी दिल्ली – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे देशातील बहुतांश कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांची कपात केली आहे, तर काही कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठ्या प्रमाणात कपात केली आहे. पण आपल्या देशात काही अशा कंपन्या देखील आहेत, ज्या कोरोनाच्या संकट काळातही बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देत आहेत.

त्याच कंपन्यांच्या यादीत रतन टाटा यांच्या आयटी कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचा (टीसीएस) देखील समावेश झाला आहे. देशभरातील कॅम्पसमधील 40 हजार फ्रेशर्सना नोकर्‍या देण्याची घोषणा टीसीएसने केली आहे. टीसीएसने गेल्या वर्षीही मोठ्या प्रमाणावर फ्रेशर्सना नोकऱ्या दिल्या होत्या. त्याचबरोबर गेल्या आठवड्यात जाहीर झालेल्या आकड्यांनुसार एप्रिल ते जून या तिमाहीत टीसीएसचा नफा 13 टक्क्यांनी घसरून अवघ्या 7,049 कोटी रुपयांवर आला आहे. कोरोनाच्या संकटामुळे झालेले हे नुकसान आहे.

टीसीएसने कोरोनाच्या संकटातही भरती काढल्यामुळे ती बेरोजगार झालेल्यांसाठी सुवर्णसंधी आहे. त्याचबरोबर अमेरिकेतील कॅम्पस प्लॅटमेंट्स टीसीएसने यंदा दुप्पट नोकरभरती करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात माहिती देताना टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश गोपीनाथन यांनी नुकतेच सांगितले की, मागणीतील सकारात्मक वातावरण लक्षात घेता कंपनी हळूहळू रोजगार उपलब्ध करून देण्यास सुरुवात करीत आहे. कोरोनाच्या अनिश्चिततेमुळे ते थांबविण्यात आले होते, पण आमच्या सर्व योजनांचे पालन करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.

Leave a Comment