मग संघाचे मुख्यालय असलेले नागपुर अद्याप कोरोनामुक्त का नाही झाला? : राजू शेट्टी


कोल्हापूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी हल्लाबोल केला असून संघाकडून जर धारावी कोरोनामुक्त केल्याचा दावा केला जात असेल, तर संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरात कोरोनाचा कहर कसा? तेथील कोरोना आटोक्यात का येत नाही, असा सवाल राजू शेट्टी यांनी विचारला आहे.

राजू शेट्टी म्हणाले, आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असलेल्या धारावीत कोरोनाचा हाहाकार माजला होता, कोरोनामुळे किड्या मुंग्याप्रमाणे माणसे मरत होती, त्यावेळी संघाचे स्वयंसेवक मदत आणि बचाव कार्यात आघाडीवर आहेत, जीव धोक्यात घालून काम करत आहेत, असे एकही वृत्त वाचनात, पाहण्यात आले नाही. पण जागतिक आरोग्य संघटनेने जेव्हा धारावीची परिस्थिती चांगल्या पद्धतीने हाताळली गेल्याचे सांगितले, त्यावेळी अनेक जण श्रेय घेण्यासाठी पुढे आले. माझ्या मनात एक छोटीशी शंका आहे, संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरातही कोरोनाचा हाहाकार आहे, तिथे देखील संघाचे स्वयंसेवक आहेत की नाही, हे मला माहिती नाही, कारण मी तरी कोल्हापूरच्या बाहेर गेलेलो नाही. इचलकरंजीत कोरोनाचा हाहाकार आहे, अनेक शहरात असल्यामुळे संघाच्या स्वेयंसेवकांनी तिथे जावे, त्याठिकाणी त्यांनी जीव धोक्यात घालून संपूर्ण महाराष्ट्र कोरोना मुक्तीचे काम करावे, संपूर्ण महाराष्ट्र त्यांना धन्यवाद देईल, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.

Leave a Comment