सचिन पायलट यांचे मोठे वक्तव्य; काही झाले तरी भाजपमध्ये प्रवेश करणार नाही


नवी दिल्ली – राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी बंड पुकारल्यामुळे ते आता भाजपमध्ये प्रवेश करतील अशा आशयाच्या चर्चा जोर धरु लागल्या आहेत. पण आपण काही झाले तरी भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचे सचिन पायलट यांनी सांगितले आहे. भाजपध्यक्ष जे पी नड्डा यांची सचिन पायलट भेट घेणार असून यावेळी त्यांच्या भाजप प्रवेशाची घोषणा होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. पण एनडीटीव्हीशी बोलताना हे वृत्त सचिन पायलट यांनी फेटाळून लावले आहे.

दरम्यान राजस्थानमध्ये वेगवान राजकीय घडामोडी घडत असून रविवारी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला. काँग्रेसने रविवारी दिवसभर घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केलेल्या दाव्याला पाठिंबा देण्यासाठी रात्री २.३० वाजता पत्रकार परिषद घेतली. यावेळी आपल्याकडे १०९ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा काँग्रेसने केला. ही पत्रकार जयपूरमध्ये अशोक गेहलोत यांच्या निवासस्थानी परिषद पार पडली.

विधिमंडळ पक्षाची बैठक झाल्यानंतर काँग्रेसकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. राजस्थानचे प्रभारी अविनाश पांडे यांनी यावेळी सांगितले की, १०९ आमदारांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नेतृत्त्वाखालील राजस्थान सरकार तसेच सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वावर विश्वास असल्याच्या पत्रावर स्वाक्षरी केली आहे.

Loading RSS Feed

Leave a Comment