नेल्सन मंडेला यांच्या कन्येचे निधन


डेन्मार्क – दक्षिण अफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांच्या सर्वात छोट्या कन्या झिंडझी मंडेला यांचे वयाच्या 59 वर्षी निधन झाले आहे. यासंदर्भातील वृत्त आयएनएस या वृत्तसंस्थेने दिले आहे. दक्षिण अफ्रिकेच्या डेन्मार्क यथे झिंडझी मंडेला या राजदूत म्हणून कार्यरत होत्या. पदावर असतानाच त्यांचे निधन झाले.


दरम्यान, झिंडझी मंडेला यांच्या निधनाचे कारण अद्याप समोर आले नाही. माजी राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांच्या 59 वर्षीय कन्या आणि अविरत सघर्ष करणारे व्यक्तीमत्व Zindzi Mandela यांचे जोहान्सबर्ग येथील एका रुग्णालयात निधन झाले, असे SABC दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. नेल्सन मंडेला यांना एकूण सहा अपत्ये होती. त्यापैकी Zindzi Mandela या सर्वात लहान तसेच सहावे अपत्य होत्या.

Loading RSS Feed

Leave a Comment