अमिताभ बच्चन यांच्यासाठी केलेल्या ट्विटमुळे ट्रोल झाली जूही चावला


बच्चन परिवाराचे प्रमुख आणि बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासह अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या यांना कोरोनाची लागण झाली आहे. नानावटी रुग्णालयात अमिताभ बच्चन आणि अभिषेक यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याबाबतची माहिती अमिताभ बच्चन यांनी स्वत: ट्विट करत दिली होती. त्यानंतर बिग बींसाठी अनेक कलाकारांनी ट्विट करत प्रार्थना केली. यासर्वांमध्ये अभिनेत्री जूही चावलाच्या ट्विटने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. या ट्विटमुळे सोशल मीडियावर तिला ट्रोल करण्यात आले.

जूहीने यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये, अमितजी, अभिषेक आणि आयुर्वेदा लवकरच बरे होतील, असे म्हटले होते. तिने ऐश्वर्या आणि अभिषेकची मुलगी आराध्याचे नाव चुकून आयुर्वेदा लिहिले होते. त्यानंतर नेटकऱ्यांनी जूहीला ट्रोल करण्यास सुरुवात केली. आयुर्वेदा आहे तरी कोण, असे एका यूजरने म्हटले आहे. दुसऱ्या एका युजरने केश किंगची जाहिरात केल्यामुळे तिच्या मनात आयुर्वेदाने घर केले आहे आणि त्याचा हा परिणाम असल्याचे म्हटले आहे. तर आणखी एका यूजरने त्यांचे सोड, तुझी लक्षणे देखील ठिक दिसत नाहीत. तू पण काळजी घे, असे म्हटले आहे.

Leave a Comment