कोरोनामुळे नोकरी गमावलेल्या भारतीयाचे नशीब फळफळले; जिंकली कोट्याधीची Lamborghini


जगावर ओढावलेले कोरोनाचे संकट दिवसेंदिवस अधिकच गडद होत आहे. या जीवघेण्या रोगाचा संपूर्ण जगातील नागरिक धैर्याने सामना करत आहेत. पण या महामारीमुळे अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्यामुळे अनेकांनी त्यात टोकाची पावलेही उचलेली असतानाच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ब्रिटनमधील एका भारतीय व्यक्तीने कोरोनामुळे नोकरी गमावली, पण त्याला याच दरम्यान एक लॉटरी लागली असून त्यामुळे तो कोट्याधीश झाला आहे.

त्या नशीबवान भारतीय व्यक्तीचे शिबू पॉल असे नाव असून तो ब्रिटनच्या नॉटिंघममध्ये राहतो. कोरोनामुळे शिबू पॉल यांची नोकरी गेली, पण त्यांना नशिबाने या संकटाच्या काळात एक सुखद धक्का देत श्रीमंत केले आहे. कोट्यावधीच्या Lamborghini कारसोबतच शिबू यांना १८ लाख रुपयांचे बक्षीसही मिळाले आहे. शिबू हे मुळचे भारतीय असून ते केरळच्या कोच्चीमधील एका स्टुडिओत साऊंड इंजिनिअर म्हणून कार्यरत होते. त्यानंतर वर्षभरापूर्वीच ते ब्रिटनमध्ये शिफ्ट झाले होते. त्यानंतर आलेल्या कोरोना संकटामुळे ते बरोजगार झाले.

त्यांनी बेरोजगारीमध्ये अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या. त्यादरम्यान त्यांनी BOTB साठी १८०० रुपयांची तीन तिकिटे खरेदी केली. कोरोनाच्या या संकट काळात त्यांचे नशीब फळफळले. शिबू यांना कोट्याधीची Lamborghini कारसोबतच १८ लाख रुपयांचे बक्षीसही मिळाले आहे.

Loading RSS Feed

Leave a Comment