चंद्रकांत पाटील यांचे महाविकास आघाडीला आव्हान; होऊन जाऊ देत पुन्हा एकदा टेस्ट


कोल्हापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांनी घेतलेल्या शरद पवारांच्या मुलाखतीवर प्रतिक्रिया देत या मुलाखतीवर त्यांनी टीका केली आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीला आव्हान देखील दिले आहे. शरद पवार यांची ऐतिहासिक मुलाखत सामनामध्ये होणार म्हणून सामनाचा सेल वाढवला. सरकार स्थिर आहे, हे सरकार बदलत नाही हा संदेश या मुलाखतीमधून द्यायचा होता. प्रशासनामध्ये चलबिचल पण या मुलाखतीमधून सुरू होती. ती थांबवायची होती. तुम्ही वेगवेगळे लढून पाहायले होते. महाराष्ट्रात एकदा टेस्ट होऊन जावू द्या, असे आव्हान यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे.

सर्वांनी वेगवेगळे लढून पाहू, प्रामाणिकपणे लढायचे, पण दोन दिवस आधी सेटलमेंट करायची नाही. शरद पवार यांनी सत्तेचा दर्प म्हटले. पण लोकांनी मतपेटीतून तसे काही म्हटले नाही. आम्ही काही म्हटले, तर आमचे राऊत काहीही लिहितात अशी टीका देखील त्यांनी केली. त्यामुळे या सरकारवर काहीही बोलायचे नाही, असे आम्ही ठरविले आहे. पण विरोधी पक्ष म्हणून भूमिका मांडत राहणार. शरद पवार यांनी मांडलेल्या भूमिकेबाबत देवेंद्र फडणवीस आपले मत लवकरच मांडतील. भाजप राष्ट्रवादीकडे गेले होते की राष्ट्रवादी भाजपकडे आले होते, यावर फडणवीस बोलतील, ते खूप गोपनीय असल्याचेही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

Leave a Comment