अंबाती रायुडू आणि पत्नी चेन्नूपल्ली विद्या यांना कन्यारत्नाचा लाभ


भारतीय संघ त्याचबरोबर आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्सचा अनुभवी फलंदाज अंबाती रायुडू आणि त्याची पत्नी चेन्नूपल्ली विद्या यांना कन्यारत्नाचा लाभ झाला आहे. अंबाती आणि त्याची महाविद्यालयीन प्रेमिका चेन्नूपल्ली विद्या यांनी 2009 मध्ये लग्न केले होते. रायुडू कुटूंबाचा एक मनमोहक सेल्फी त्याची आयपीएल फ्रेंचायझी चेन्नई सुपर किंग्जने पोस्ट केला आणि या वृत्ताला अधिकृत ट्विटर हँडलच्या माध्यमातून दुजोरा दिला.

View this post on Instagram

Truly blessed…

A post shared by Ambatirayudu (@a.t.rayudu) on


चेन्नई सुपर किंग्जच्या पोस्टवर यूजर्स आणि खेळाड असे सर्वत्र अभिनंदन संदेश येत आहेत. भारतीय स्टार आणि अंबाती रायुडूचा आयपीएलचा सहकारी सुरेश रैना याने देखील नवीन पालकांचे अभिनंदन केले आणि त्याने ट्विट करत लिहिले,आपल्या मुलीच्या जन्माबद्दल अंबाती रायुडू व विद्या यांचे मनःपूर्वक अभिनंदन. लहान मुलीसोबत प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या आणि तुम्हा सर्वांना खूप प्रेम आणि आनंदी शुभेच्छा!

Leave a Comment