नीतू सिंह आणि रणबीरला कोरोना झाल्याची अफवा


काल बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याचे कळताच सिनेसृष्टीत एकच खळबळ उडाली. पण या वृत्तानंतर सोशल मीडियावर सध्या बॉलिवूडमधील अनेक कलाकार कोरोना झाल्याच्या बातम्या व्हायरल होत आहेत.


यातच रणबीर कपूर आणि त्याची नीतू सिंह कोरोनाबाधित असल्याची बातमी पसरली. रणबीर कपूर, नीतू सिंह यांनी या व्हायरल पोस्टबाबत माध्यमांना सांगितले नसले तरी इंस्टाग्रामच्या माध्यमातून रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा कपूरने व्हायरल होत असलेल्या बातमीवर संताप व्यक्त करत लिहिले आहे की, अशी बातमी केवळ लक्ष वेधण्यासाठी दिली आहे का? अशा बातम्या पसरवण्याआधी खरे की खोट तरी तपासा. आम्ही ठीक आणि ठणठणीत आहोत. अफवा पसरवणे बंद करा.

Leave a Comment